
इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन
पंढरपूर/ धुरंधर न्युज
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर मार्फत महिला-मुलींकरिता ब्युटी थेरपी अँड हेअर स्टाईल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. ५ जानेवारी पासून करण्यात आले आहे.
या ३० दिवसीय प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर विषयांस अनुसरून विविध उद्योग संधी, अ प्रकार, स्कीन केअर व हेअर स्टाईल प्रकार, साडी ड्रिपींग, मेकअप, आयुर्वेदिक ट्रिटमेंट, स्पा सेंटर, ब्लिचिंग, व्हॅक्सिन, मशनिरीचे प्रकार, गॅलव्होनिक, कॉस्मेटिकस इत्यादी अशा विषयासंदर्भात थेअरी व प्रॅक्टीकलसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासकीय कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्राचे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेची माहिती, उद्योगांचे रजिस्ट्रेशन, बँकेची भूमिका, प्रकल्प अहवाल, बाजारपेठ सर्वेक्षण, मार्केटिंग, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास यांचे मार्गदर्शन तज्ञांमार्फत मिळेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळेल. प्रशिक्षणात भाग घेण्यास शिक्षण कमीत कमी ८ वी पास, वयोमर्यादा जास्तीत जास्त ५० वर्षे पर्यंत असावे. अधिक माहिती व प्रवेशासाठी पंचायत समिती खादी व ग्रामोद्योग विभाग, पंढरपूर येथे संपर्क साधावा. महिला व युवतीनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रकल्प समन्वयक अमृता पालवे ( ७९७२२८९२६५) यांनी केले आहे.