मोहोळ/धुरंदर न्यूज
मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले असताना प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणुन रमेश बारसकर यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटुन सत्तेत सहभागी झाल्यानंतर मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन लोकनेते बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, यासह प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रांतिक सदस्य मानाजी माने, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला.
दरम्यान राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार पडले असतानाही रमेश बारसकर यांनी माञ शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रात शरद पवार यांनी जपला आहे असे म्हणत त्यांची एकाकी खिंड लढवण्याची भुमिका घेतली.
दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सदिच्छा भेटी साठी गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिफारशीनुसार व साठे यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी असून जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे यांच्याकडून मोहोळ तालुका अध्यक्ष प्रभारी पदाची जबाबदारी रमेश बारसकर यांनी स्वीकारली.