राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तेजस बोबडे यांची निवड

मोहोळ तालुक्यात पक्ष वाढीसाठी करणार प्रयत्न

मोहोळ, धुरंधर न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी खवणी (ता. मोहोळ) येथील तेजस दत्तात्रय बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सुपूर्द केले. खवणी (ता. मोहोळ) येथील तेजस बोबडे हे गावचे उपसरपंच म्हणून कार्यरत असून त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार विभागाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी तेजस दत्तात्रय बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील व बळीराम काका साठे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागेश फाटे प्रदेशाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उपस्थितीत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी संजय बाबा कोकाटे, सागर पडगळ, मयूर काळे जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. खा. शरदचंद्र पवार, जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार आ. रोहित पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहणार असून मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे निवडीनंतर बोबडे यांनी सांगितले.

या निवडीबद्दल खा. धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, तालुकाध्यक्ष विनय पाटील, विधानसभा अध्यक्ष रणजीत चवरे, विक्रांत दळवी, युवा नेते विजय कोकाटे यांनी अभिनंदन केले.फोटो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *