पेनुरचे मानाजीराव माने शाळेसाठी खरे यांच्या प्रयत्नातून २१ लाखाचा निधी

मोहोळ तालुक्यातील अडचणीतील शाळेना मदत करणार असल्याची हमी

मोहोळ/धुरंधर न्युज

मोहोळ विधासभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मतदार संघात मदतकार्य करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. अशातच मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते मानाजीराव माने यांचे शाळेच्या ईमारत बांधकामासाठी तब्बल २१ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.


पेनुर येथील एका कार्यक्रमानिमित्त उद्योजक राजू खरे गेले होते. त्यावेळी या इमारतीची अवस्था पाहून खरे यांनी आपणच या शाळेसाठी लागेल तेवढी मदत करू असे आश्वासन दिले होते.त्यानुसार मागील महिन्यात ११लाख आणि शनिवारी १०लाख रुपयाचा धनादेश गोपाळपूर येथील फार्म हाऊसवर उद्योजक राजू खरे आणि त्यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या हस्ते वरील धनादेश दिला आहे.


हा धनादेश स्वीकारताना मानाजीबापू माने यांचे चिरंजीव युवा नेते विक्रम माने,मुख्याध्यापक देविदास रणदिवे, सहशिक्षक राजाराम गायकवाड, धनाजी जाधव, तानाजी कांबळे, गुरुनाथ माने, कल्याण वाघमारे, पांडुरंग जगताप, अमोल वाघमारे, अनिल राजगुरू, समाधान सावंत, धनाजी माने, आदी उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील राजकारण एक दडपशाहीच्या मार्गावर चालू आहे. त्यामुळे न्याय आणि मदत देताना अनेक बाबी तपासून दिल्या जातात. यामुळे खरी गरज असलेल्या लोकांना मदत होत नाही. ही बाब आपल्या लक्षात आली असून मी नेमके याउलट ज्यांना मदत झाली नाही आशा लोकांना मदत कार्य सुरू ठेवले आहे. मोहोळ येथील मुखबधीर व मतिमंद शाळेसाठी २५लाखाची तरतूद केली असल्याचे राजू खरे यांनी सांगितले . केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण मदत करत नाही. शाळेसाठी करण्यात येत असलेली मदत ही गोरगरीब मुलांना शिक्षण घेण्याकामी उपयोगात पडणार असते.त्यामुळे राजकारण करीत ज्यांना मदत झाली नाही. त्यांना आपण नक्की मदत करणार असल्याचेही खरे यांनी सांगितले आहे.


महाराष्ट्र राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू खरे यांचे भावजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एम. डी.) अनिलकुमार गायकवाड यांच्या सहकाऱ्याने सी.एस. आर फंडातून सदरचा निधी आपण मिळवून दिला आहे. यापुढेही आणखी मोहोळ भागातील इतर संस्थेनेही मागणी केली असून , लवकरच त्यांच्यासाठीही आपण विशेष प्रयत्न करीत असल्याचेही राजू खरे यांनी सांगितले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *