सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कळसे यांची मागणी
मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ शहरात अलीकडे मोटारसायकल चोरीसह घरफोड्या चे प्रमाण वाढले असून पर्यायाने मोहोळ शहरात पोलीस विभागाकडून रात्रीची गस्त वाढवून शहरातील समाजकंटकांची यादी तयार करावी, रात्री मोकाट फिरणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कळसे यांनी केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कृषी यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या १५ दिवसापासून मोहोळ शहरात भुरट्या तसेच मोठ्या दुकान फोडी, मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील काही उपद्रवी लोक यातील सहभागाची चौकशी करून तशी यादी तयार करून पुढे घटना घडल्यास जबाबदार धरण्यची नोटीस देवून तसेच रात्री १२ नंतर फिरणाऱ्या सर्वांची कसून तपासणी योग्य कारण तपासून विनाकारण फिरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच सुळेनगर, क्रांतीनगर, दत्तनगर, कळसेनगर या भागात कॅनॉल वरून गस्त वाढवावी कारण कॅनॉल भागातून या अगोदर बऱ्याच गंभीर घटना घडल्या असून कॅनॉल मार्ग हा सर्व चोरीतील महत्वाचा पळून जाण्याचा मार्ग असल्यानं नंदनवन हॉटेल ते जुना बाभुळगाव रस्ता कॅनॉल मार्गे नव्याने रात्री १२ नंतर गस्त सुरु करावी, अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कळसे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.