मोहोळ/धुरंदर न्यूज
क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्टस् अकॅडमी च्या वतीने उन्हाळी सुट्टी निमित्त मोफत व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगा प्राणायाम, संस्कार वर्ग, भाषण कौशल्य, स्वयंशिस्त, परिसर स्वच्छता तसेच स्वसंरक्षणासाठी कराटे, बॉक्सिंग, प्राचीन युद्धकला मधील काठी लाठी, दांडपट्टा, तलवार अशा अनेक खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत क्रांतिवीर भगतसिंग कराटे स्पोर्टस् अकॅडमी च्या वतीने संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांच्या वतीने समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत दि.22 एप्रिल रोजी सुरू होऊन दि. 15 मे रोजी समारोप समारंभ पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिबिरामध्ये घेण्यात आलेल्या अनेक खेळांची उत्स्फूर्तपणे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
दरम्यान या शिबिरासाठी देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे सचिव शैलेश गरड यांचेही अकॅडमीच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाचे सचिव शैलेश गरड, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश झाडबुके, बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई फाटे, गरड महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, प्रा. अशोक पाचकुडवे, प्रा. नंदकुमार चव्हाण, ऍड. अमोल देशपांडे, डॉ. अमोल हराळे, बळीराम भुसे, आरोग्यम ग्रुपचे सचिन शास्त्री, पो. कॉ. हनुमंत वाघमोडे, देविदास चेंडगे, संतोष बचुटे, मंगेश पांढरे, राजू हक्के, महेश गायकवाड, सुरेश काळे, दिलीप शिंदे, आकाश राऊत तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.