किमान वर्षातून शरीराची आरोग्य तपासणी आवश्यक .. पोलीस निरीक्षक विनोद घुगे

जकराया प्रतिष्ठान मार्फत पत्रकारांसाठी लिपिड हृदयम रक्त तपासणी शिबिर संपन्न

मोहोळ/धुरंदर न्यूज

आजच्या धावपळी व धकाधकीच्या जीवनात शरीरावरील मानसिक ताण वाढत असून यासाठी सहा महिने किंवा किमान वर्षातून आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असून जकराया प्रतिष्ठान मार्फत आयोजित केलेले सामाजिक उपक्रम आदर्शवत व स्तुत्य असल्याचे प्रतिपादन मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.

जकराया उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ऍड. बी.बी जाधव यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त मोहोळ तालुक्यातील पत्रकार बांधवांची “लिपिड हृदयम रक्त चाचणी तपासणी शिबिर” मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक विनोद घुगे होते. यावेळी जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लखन गुरव, जेष्ठ पत्रकार राजकुमार शहा, माजी अध्यक्ष गोरा कुंभार उपस्थित होते.

शरीराला एखादी अडचण आल्यावरच आरोग्य तपासणी करण्यापेक्षा प्रत्येक सहा महिन्याला आरोग्य तपासणी केल्यास आरोग्याच्या अडचनी येण्यापूर्वी उपाययोजना करून शरीर सुदृढ ठेवता येते. त्यामूळे वेळेवर आरोग्य तपासण्या करीत प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोहचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले.

समाजात अनेक जण केवळ ८ तास काम करत असताना पत्रकार मात्र २४ तास समाजातील विविध घटना टिपण्यासाठी सतर्क असतो, परिणामी त्यांच्यावर मानसिक तणाव येऊन आरोग्याच्या समस्या उद्भवल्या जातात, म्हणूनच जकराया प्रतिष्ठान गेल्या वर्षभरापासून आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रमा अंतर्गत महत्त्वाचा घटक असलेल्या पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, महेश कुलकर्णी, बापू काळे, सुभाष शिंदे, विष्णु शिंदे, किशोर मारकड, भारत नाईक, संजय आठवले, श्रीधर उन्हाळे, राम कांबळे, दशरथ काळे, रजनीश कसबे, अरुण भोसले, चंद्रकांत देवकते, महेश माने, साहिल शेख, यासीन अत्तार, बालाजी शेळके, शैलेश धोत्रे, दिनेश सातपुते यांच्यासह मिरीचे बापु पाटील, प्रतिष्ठान चे सचिन कानडे, शरद बनसोडे, गणेश चौगुले, नागनाथ शिंदे, सिताराम भोसले आदि उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *