लाखो भक्ती- भाविकांना घडले दर्शन
मोहोळ/धुरंधर न्युज :
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाले असून २० एप्रिल रोजी चैत्र शुद्ध द्वादशी शंभू महादेवाला अभिषेक करण्यास साठी अवघड अशा सोलापूर जिल्ह्यातील मुंगी घाटातून हर हर महादेवाच्या गजरात दुपारी तीन पासून कावडी मुंगी घाट चढण्यास सुरुवात झाली सासवड येथील तेल्या भुत्याच्या मानाच्या कावडीने ४:४५ वाजता शंभू महादेवाची आरती करून मुंगे घाट सर करण्यास सुरुवात केली तेल्या भुत्याच्या कावडीने मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सायंकाळी सात वाजता सर केला आणि सर्व शिवभक्तांना भक्ती शक्तीचे दर्शन घडले यावेळी माळशिरस तहसिलदार सूरेश शेजूळ,गटविकास अधिकारी विनायक गूळवे, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सपोनी महारूद्र परजणे, पी,एस.आय.विक्रात दिघे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अमोल आव्हाड, कोथळे गावचे पोलीस पाटील आगम आधी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातून यात्रेसाठी भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात शिखर शिंगणापूर मंदिर समुद्रसपाटीपासून ३२०० उंचीवर असलेल्या पर्वतरांगावर हे अति प्राचीन व भव्य असे हे हेमांडोपंती शंभू महादेव मंदिर असून सुंदर व भव्य असे मजबूत असलेले तटबंदी बांधकाम आहे या ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपादा ते पौर्णिमेपर्यंत यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते येथे आपल्या भागातील पवित्र नद्यांचे पाणी कावडीच्या दोन रांजणामध्ये भरून आणले जाते अभिषेक म्हणून देवाच्या पिंडीवर धार घातली जाते या यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर आरोग्याच्या दृष्टीने मोरोची, फोंडशिरस, मांडवे, मानकी, पिलीव, शंकर नगर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मनुष्यबळ व यंत्रणा ठेवण्यात आली होती.