बेरोजगारांसाठी रिक्षा प्रशिक्षण, सहभागी होण्याचे आवाहन


सारथी युथ फाउंडेशन मागील १२ वर्षांपासून तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्यात काम करत आहे. युवा वर्ग बेरोजगारीमुळे व्यसनाकडे वळत आहेत. युवकांमधिल व्यसनाधिनता कमी करण्यासाठी सारथी युथ फाऊंडेशन विविध उपक्रम राबविते. बेरोजगार युवकांमध्ये कौशल्यांचा अभाव असल्याने त्यांच्या हाताला काम मिळत नाही. सोलापुर शहरामधिल अशा या गरजू युवक-युवतींच्या कौशल्याचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण सारथी युथ फाऊंडेशन व वात्सल्य ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाते.


आजपर्यंत चारचाकी व तीनचाकी वाहन चालक प्रशिक्षणाच्या आठ बॅच पूर्ण झाल्या असून १३५ युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले असून यामधील जवळपास ६० सहभागी प्रशिक्षणार्थींनी स्वतः वाहन चालवत उपजीविकेचे साधन म्हणुन या कौशल्याचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंतच्या प्रशिक्षणासाठी खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला असून रोजगार मिळवण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग झालेला आहे असं दिसुन येत आहे.


समाजात निर्व्यसनी ड्रायव्हरची मागणीही जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी सारथी निर्व्यसनी ड्रायव्हर तयार करण्याचा प्रयत्न करते. निर्व्यसनी असलेल्या अथवा व्यसन सोडुन रिक्षा चालक बनु इच्छिणाऱ्या बेरोजगार, विधवा- विधुर अशा गरजू व इच्छुक युवक-युवतीनी रिक्षा प्रशिक्षणात सहभागी व्हावे. रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासोबत प्रशिक्षणार्थींना लर्निंग व पक्के लायसन्स देखील काढून देण्यात येईल. प्रवेशाची अंतिम तारीख १४/५/२०२५.
इच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी तंबाखू व्यसनमुक्ती हेल्पलाईन ७२७६६७७२७७ वर संपर्क साधावा अथवा एक आधारकार्ड झेरॉक्स आणि आयडी साईज फोटो घेऊन सारथी युथ फाउंडेशनच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, राजराजेश्वरी शाळेजवळ, आकाशवाणी -नवीन विडी घरकुल रोड, विनायक नगर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन सारथी युथ फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *