मोहोळ/धुरंधर न्यूज
मंथन वेल्फेअर फाउंडेशन अहमदनगर संचलित फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातपुते वस्ती’ येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेले प्रज्वल गणेश सातपुते व दिग्विजय धनाजी वसेकर या दोघांनी १५० पैकी १४८ गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
पाटकुल (ता.मोहोळ) येथे शिकणाऱ्या या दोघांना यशामध्ये वर्गशिक्षक अरविंद भंडारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम गलांडे, तसेच शाळेतील शिक्षक रत्नदीप जानराव, दत्तात्रय घोळवे, धनाजी इंगळे, संजय पवार, अरविंद भंडारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक शेटे, उपाध्यक्ष कान्होपात्रा वसेकर, गावचे सरपंच शिवाजी भोसले, मनोज सातपुते, भाऊराव ननवरे तसेच पेनुर केंद्राचे केंद्रप्रमुख खुणे, विस्तार अधिकारी विकास यादव, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन केले.
या यशासाठी मुलांना त्यांचे पालक गणेश सातपुते, चैताली सातपुते, धनाजी वसेकर कान्होपात्रा वसेकर यांची मोलाची साथ लाभली. यासह इयत्ता तिसरी मधील अभिरूप परीक्षेत सार्थक सचिन शेळके तर इयत्ता आठवी मध्ये अमृता सुनिल वसेकर व हर्षद शंकर वसेकर यांनीही यश मिळवले.