मोहोळ विधानसभेसाठी २९ जणांचे अर्ज दाखल
मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी आमदार यशवंत माने, महाविकास आघाडीचे राजू खरे, माजी आमदार रमेश कदम, संजय क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर यांच्यासह २३ जणांनी २७ नामनिर्देशन फॉर्म दाखल केले असून आतापर्यंत उमेदवाराची संख्या २९ जणांनी ३८ नामनिर्देशन फॉर्म दाखल केले आहेत. दरम्यान आता अर्ज काढण्याच्या दिवशी पर्यंत एकूण किती अर्ज राहणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी समाधान होनकळस अपक्ष , कैलास सातपुते अपक्ष, रमेश कदम अपक्ष, सिद्धी कदम अपक्ष, किशोर पवार अपक्ष, तृप्ती खरे अपक्ष, चंद्रकांत होनकळस अपक्ष, यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्रीकांत माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यशपाल गवळी अपक्ष, नंदू क्षीरसागर ब्लूइंडिया पार्टी, सुरेश थोरात अपक्ष, सुरज कांबळे अपक्ष, राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, राजश्री गायकवाड अपक्ष, बळीराम मोरे बहुजन समाज पार्टी, अतुल वाघमारे वंचित बहुजन आघाडी, नागनाथ क्षीरसागर महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, नागेश वनकळसे अपक्ष, कृष्णा भिसे अपक्ष, नागनाथ देविदास क्षीरसागर राष्ट्रीय समाज पक्ष, शामराव जवंजाळ अपक्ष, संजय क्षीरसागर अपक्ष या २३ जणांनी २७ नामनिर्देशन फॉर्म दाखल केले असून आतापर्यंत उमेदवाराची संख्या २९ जणांनी ३८ नामनिर्देशन फॉर्म दाखल केले आहेत.
महायुतीमार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार यशवंत माने यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत मार्केट कमिटीचे तहसील कार्यालय पायी चालत रॅली द्वारे अर्ज भरला. यावेळी महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, कल्याणराव पाटील लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, निवडणूक प्रमुख रमेश माने, शिवसेनेचे दादासाहेब पवार, यशवंत नरोटे यांची उपस्थिती होती.
सोमवारी संध्याकाळी मोठी खलबते घडून उमेदवार सिद्धी रमेश कदम यांचे एबी फॉर्म रद्द करून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू खरे यांनीही ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, बळीराम साठे, उमेश पाटील, मनोहर सपाटे, गणेश वानकर, दीपक गायकवाड, पद्माकर देशमुख, मानाजी माने, काका देशमुख, विजयराज डोंगरे, सीमाताई पाटील, महेश देशमुख, शिवरत्न गायकवाड, तृप्ती खरे, विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला.
यासह सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेले सिद्धी रमेश कदम, माजी आमदार रमेश कदम यांनीही मंगळवारी आपले अपक्ष अर्ज दाखल केले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते संजय क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन अपक्ष अर्ज दाखल केले.
कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी चांगले दिवस असतानाही मोहोळ तालुक्यातील राज्याचे नेते म्हणून घेणाऱ्या अनेकांना दारावरूनच हाकलून देण्यात येत आहे. यावरून त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सांगत गेल्या पाच वर्षाच्या काळात आमदार यशवंत माने यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते शंभर टक्के निवडून येणार असल्याचा दावा माजी आमदार राजन पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या सभेमध्ये केला.
मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती आता मोहोळ विधानसभा बचाव समिती झाली असून मोहोळ विधानसभा मतदारसंघातील तानाशाही, झुंडशाही, दडपशाही तसेच विकृत मनोवृत्तीचे नेतृत्व संपवून तालुक्याचा कारभारी बदलून मोहोळ तालुक्याला विकासभिमुख व सर्वसामान्य घरातलं खऱ्या अर्थाने ज्या समाजाला हा मतदारसंघ राखीव आहे, त्या समाजाला न्याय देण्याच्या करता देशाचे नेते शरद पवार यांनी राजू खरे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन उमेश पाटील यांनी केले.