मोहोळ /धुरंदर न्यूज
नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे.अक्षय भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समुहासोबत वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे. दोषींवर ॲट्रोसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मोहोळ तहसीलदार यांना निवेदन देऊन हत्येचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव प्रकाश सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर,युवक तालुका अध्यक्ष भारत कसबे, विजय भालेराव, माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र आवारे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे, युवक उपाध्यक्ष प्रशांत जगताप, शहराक शेख, रणजीत गायकवाड, दादा जवंजाळ,नाना कुचेकर,सतीश कसबे,सचिन क्षिरसागर, अविनाश क्षिरसागर, सुधाकर उघडे आदी उपस्थित होते.