मोहोळ, धुरंधर न्युज
मोहोळ तालुक्यातील खवणी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ७५० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले. सोमनाथ चांगदेव सोनवणे (वय ३६, रा. सौंदणे, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराने शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत लघुपाटबंधारे तलाव पोखरापूर येथून काढलेला गाळ टीपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वःखचनि नेऊन त्यांच्या शेतामध्ये पसरविला होता. त्याअनुषंगाने जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग यांच्याकडून योजनेतून पूर्ण केलेल्या कामाचे ध्येय अनुदान ग्रामपंचायत खवणी येथे वितरित करण्यात आले होते. ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्याला देण्याचे आदेश शासनाने केले होते. त्याचा धनादेश देण्यासाठी आरोपीने साडेसातशे रुपये लाच स्वीकारली असता त्यास गजाआड करण्यात आले आहे.