
मोहोळ/धुरंदर न्यूज
मोहोळ येथील लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू येथे जागतिक महिला दिनानिमित्त हॉस्पिटल मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी हॉस्पीटलचे संचालक डॉ सागर फाटे तसेच डॉ मनोज देवकते यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन महिलाना सन्मानित करण्यात आले.
आपल्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला रुग्णांना तर सन्मानाची वागणूक देऊच…. परंतु कामगार महिलांना देखील सन्मानाची व चांगली वागणूक देऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेऊन योग्य वेळी त्यांना त्यांच्या कार्याची पोच पावती देणार असल्याची ग्वाही हॉस्पीटलचे संचालक डॉ सागर फाटे यांनी दिली.
यावेळी हॉस्पीटलचे मुख्य फिजिशियन डॉ सुभाष कमळे, डॉ मनोज देवकते, डॉ संध्या काळे, डॉ मोहिनी जिरगे, व्यवस्थापक दादासाहेब गायकवाड, यांच्यासह हॉस्पीटल मधील सर्व महिला कामगार उपस्थित होत्या.
