बाळराजे पाटील यांनी पारंपारिक विरोधकासह सर्वांच्या मानले आभार..
मोहोळ /धुरंधर न्युज
मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक बिनवरोध झाली असून दि.३ एप्रिल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार राजन पाटील गटाचे १८ जागेसाठी १८ अर्ज दाखल झाल्याने जिल्हातील एकमेव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली असून केवळ प्रशासकीय औपचारिक घोषणा बाकी आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी यावेळी सर्वच नवीन चेहऱ्याला संधी दिल्याचे दिसून येत आहे.
१९५४ साली स्थापन करण्यात आलेल्या मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासूनच अनगरकर पाटील परिवाराचे वर्चस्व आहे. मोहोळ तालुक्यातील वेगवान राजकीय घडामोडी पाहता यावेळी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निवडणुकीमध्ये कोणत्याही विरोधकांनी सहभाग नोंदवला नसल्याने माजी आमदार राजन पाटील गटाचे सर्वच जागेवर प्रत्येकी एक असे १८ अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली असून केवळ प्रशासकीय औपचारिक घोषणा बाकी आहे.
नूतन संचालका मध्ये प्रशांत भागवत बचुटे (वरकुटे), नागराज अप्पासाहेब पाटील (शेजबाभुळगाव), गोविंद अंबरशी पाटील (डिकसळ), सावंत संतोष पांडुरंग (पिरटाकळी), सुरवसे माणिक नेमिनाथ (वडदेगाव), गावडे धनाजी सुरेश (सावळेश्वर), बाबर सचिन जनार्दन (खंडाळी), सोसायटी महिला राखीव स्मिता दत्तात्रय काकडे (पोखरापुर),दिपाली सज्जन चवरे (पेनुर), सोसायटी ओबीसी कुंभार विकास बाबासाहेब (मोरवंची), सोसायटी भ.वि.जा.ज सलगर शाहीर गणपत (सारोळे), ग्रामपंचायत आ.दु.घटक जाधव पोपट केशव (येणकी), ग्रामपंचायत सर्व साधारण साठे बाळकृष्ण आप्पासाहेब (भोयरे, नवनाथ माणिक वराडे (इंचगाव), ग्रामपंचायत अ.जा जमाती गायकवाड बाळासाहेब पांडुरंग (जामगाव बु.)
व्यापारी मतदारसंघ महेश शरद आंडगे (मोहोळ), घोंगडे राजशेखर सुरेश (मोहोळ), हमाल/तोलार मतदारसंघ राऊत भीमराव विठोबा (अनगर) यांची नियुक्ती झाली आहे.
स्थापनेच्या सुरुवातीपासून माजी आमदार बाबुराव अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तदनंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कृषी उत्पन्न बाजार समितीची घोडदौड सुरू आहे. यावर्षी विशेष म्हणजे शेतकऱ्यांतून सर्वच उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी होती, असे असताना सुद्धा केवळ राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील सर्वच नेते, कार्यकर्ते, शेतकरी, सभासद, व्यापारी, पारंपारिक विरोधक या सर्वांनीच सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करत असल्याचेही यावेळी लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सांगितले.