मोहोळ /धुरंदर न्यूज
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सन्मानार्थ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना सामाजिक बांधिलकी जपत मोहोळ तालुका युवासेना याच्या वतीने अल्पोहार (अंडे, बिस्कीट, केळी, मसाले दूध, फळे इ.) वाटप करण्यात आला.
मोहोळ तालुका युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते याच पार्श्वभूमीवर यावेळी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना अल्पआहाराचे वाटप वैद्यकीय अधिकारी मृदुला बाबर, जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ गुंड, युवासेना तालुकाप्रमुख विजय दादा गायकवाड, वाहतूक सेना तालुका प्रमुख सोमनाथ पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी गोविंद व्यवहारे, ऋषिकेश गायकवाड, गोटू क्षिरसागर, संतोष महाळनूर, आनंद राऊत, गोपाळ व्यवहारे, प्रदीप माने, अमोल लेंगरे, सागर पाटील, शुभम हावळे, ओंकार होनमाने, मनोज लटके आदि युवासैनिक उपस्थित होते.