एकाच तालुक्यात दोन टोलनाके| पेनुर येथील टोल नाका बंद करावा

वाहनधारकांना बसतोय भुर्दंड


मोहोळ/धुरंधर न्युज

मोहोळ शहरातील बरस्थानकासमोरील पालखी मार्गाचे अर्धवट असलेले काम लवकर पुर्ण करावे यासह पुणे सोलापूर मार्गावरील टोल नाका असल्याने मोहोळ तालुक्यात दोन टोलनाके झाल्याने वाहनधारकांना मोठा भुर्दंड भरावा लागत आहे. पर्यायाने मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर पेनूर हद्दीमध्ये असलेला टोल नाका बंद करण्याची मागणी भाजपाच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ काळे यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असून मोहोळ पंढरपूर या पालखी मार्गालगत मोठे बसस्थानक आहे. त्यामुळे सातत्याने प्रवाशांची व वाहनांची वर्दळ असते. बसस्थानकासमोरील पंढरपूर कडे जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत पडलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी लहान मोठे अपघात झालेले आहेत. रस्ता संरक्षक पोल न लावल्यामुळे जनावरे व डुकरे रस्त्यावर येतात. त्यातून दूचाकी स्वराचा अपघात होऊन एक जणाचा मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे. पालखी मार्ग प्रशासनाने इतर ठिकाणी ज्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त घेऊन काम केले आहे, त्याप्रमाणे त्या ठिकाणीही पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अपूर्ण असलेले काम मार्गी लावावे. आषाढी वारीच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी होते. त्या गर्दीतून एखादा मोठा अपघात घडल्यास पालखी मार्ग व टोल प्रशासनाला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे. तसेच मोहोळ पंढरपूर ते आळंदी पर्यंत असलेल्या २३४ कि.मी. अंतराच्या या पालखी मार्गावर अद्याप पर्यंत टोल नाका नाही. मात्र मोहोळ ते पंढरपूर ४० किमी अंतरासाठी टोल नाका करून वसुली सुरू करण्यात आली आहे. मोहोळ शहरालगत पूर्वेकडे सावळेश्वर तर पश्चिमेकडे पेनुर टोलनाका आहे. सोलापूर मोहोळ मार्गे पंढरपूरला भाविकांना व तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर टोल भरून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पुन्हा एकदा दुसरा टोल भरण्याची वेळ आली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना डबल टोलचा भुर्दंड बसत आहे. तसेच स्थानिक नागरिक या टोलमुळे त्रस्त आहेत. तरी पेनुर येथील टोल नाका तात्काळ बंद करावा व पालखी मार्गावर अपूर्ण असलेली कामे तात्काळ मार्गी लावावी. अशी मागणी निवेदनाद्वारे दशरथ काळे यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती रस्ते व परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पाठवल्या आहेत.

यावेळी महादेव खिलारे, संजय पालकर, रोहिदास बंदपट्टे, रवींद्र कोळी, योगेश मस्के, लहू इटकर, चेतन नेहातराव आधी उपस्थित होते.फोटो.

मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर पेनुर येथे टोल नाका झाल्यामुळे मोहोळ तालुक्यातील वहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांना तसेच सोलापूरहून पंnq ढरपूरला जाणाऱ्या सर्व भाविकांना याचा नाहक त्रास व भुर्दंड सोसावा लागत आहे, सोलापूर ते पंढरपूर या ७० किलोमीटरच्या अंतरामध्ये सावळेश्वर व पेनुर हे दोन टोळनाके झाल्यामुळे वाहनधारकांना डबल टोळ भरावा लागत असल्यामुळे मोहोळ मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या भाविक व नागरिक इतर पर्यायी रस्त्याचा अवलंब करत आहेत भविष्यात याचे प्रमाण वाढून मोहोळचे रस्ते ओस पडतील व रस्त्याच्या कडेला असलेले छोटे छोटे व्यवसाय बंद पडून त्या ठिकाणच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.


दशरथ काळे
उपाध्यक्ष: भाजपा पंचायतराज ग्रामविकास विभाग
पश्चिम महाराष्ट्र

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *