
मोहोळ/धुरंदर न्यूज
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता नरखेड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील चव्हाण यांनी दिली.

या सत्कार सोहळ्याच्या व शेतकरी मेळाव्याच्या नियोजनाची बैठक नरखेड येथे तोरणागड येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे होते.
नरखेड येथील क्रांती लॉन्सवर होणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धनंजय महाडिक, जय सिद्धेश्वर महास्वामीजी,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी,आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, शहाजी पाटील,राजाभाऊ राऊत,रणजितसिंह मोहिते-पाटील,समाधान आवताडे, राम सातपुते,माजी आमदार प्रशांत परिचारक,भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यासह जिल्हाभरातून कार्यकर्ते आणि शेतकरी या मेळाव्याला येणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी तालुक्यातील विविध अर्धवट योजना आणि सूक्ष्म व लघु उद्योग खात्यामार्फत एखादा मोठा उद्योग या तालुक्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
या बैठकीला भाजपचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लिंगदेव निकम,तालुका संघटन सरचिटणीस सतीश पाटील,महेश सोवनी,माऊली भगरे,राहुल गुंड-अनगरकर,संजय वाघमोडे,धनाजी गरड, आदी उपस्थित होते.
