विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीच्या वाटचालीत शाळेचा मोठा वाटा..
मोहोळ/धुरंधर न्युज
जिल्हा परिषद केंद्र शाळा कोन्हेरी येथे विविध विभागातून मिळालेल्या फंडातून एल ई डी टिव्ही संच, १५ सायकल वाटप, डॉ. एपिजे अब्दुल कलाम सायन्स लॅब, इंटरऍक्टिव्ह बोर्ड, संगणक संच आदि उपक्रमाचे उदघाटन समारंभ पार पडला.
मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथे रोडवे सोल्युशन इंडिया प्रा.लि पुणे यांच्या ५ लाख सीएसआर फंडातून संगणक कक्ष, एलईडी टीव्ही संच, सायकल बँक उपक्रमांतर्गत गरजू मुलींना १५ सायकलीचे वाटप यासह सर्व शिक्षा अभियानांतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हिनेशन सेंटर व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते रनजीतसिंह डीसले यांच्या प्रयत्नातून इंटरऍक्टिव्ह बोर्ड चे उदघाटन पुणे चे आयकर आयुक्त सदानंद कसल्लु व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड च्या राजश्री गुंड यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजीव जावीर हे उपस्थित होते. यावेळी गट शिक्षाधिकारी मल्लिनाथ स्वामी, सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीनिवास पदमावर, विस्तार अधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ, बेस्ट परिवहन चे अधिकारी राजेंद्र डूबल, उद्योजक राजसिंह डूबल, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर खुणे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सविता कौलगे, मुख्याध्यापक पद्मिनी गुंड, गणेश फडतरे, विजय डूबल, प्रभाकर भोसले, तानाजी गुंड, भीमराव माने,
सरपंच गणेश पांढरे, रामचंद्र शेळके, बाळासाहेब शेळके, राजकुमार पाटील, भिमराव जरग, विलास शेळके, सुधीर पुळजे, तनाजी गुंड, रामदास जरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी संजय जावीर, आयकर उपायुक्त सदानंद कसल्लू, सहाय्यक आर टी ओ अधिकारी राजश्री गुंड यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर यावेळी पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेले मोहन माने, अमर कदम, प्रविण डोंगरे , शुभम मुळे यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सुभाष जरग, सुनीता पुलजे, बाबुराव शेळके, रहीमतुला मुजावर, रणजित थिटे, आप्पा भोसले, कांतीलाल शेळके, आण्णा सुरवसे, सुहास राऊत, संजय पोतदार, रोहीदास कांबळे, दत्ता गायकवाड, नितीन चितारे, नागेश भाकरे, अनिल पांढरे, श्रीराम क्षीरसागर, अस्मिता कांबळे, आण्णासाहेब पाखरे,
नंदकुमार गोसावी, राजेन्द्र गुंड, दत्ता माळी, निलेश जरग, विनायक डोंगरे, तानाजी शेळके, दिपक शेळके, पप्पू शिंदे, दिनकर कौलगे, बाळासाहेब भोसले, संदीप जरग, विजय कांबळे, बालाजी कदम, भास्कर माळी, आण्णासाहेब माने, नागनाथ पवार आदि उपस्थित होते.