जकराया प्रतिष्ठान कडून पत्रकार बांधवांच्या पांल्याचा सन्मान

सामाजिक उपक्रम


मोहोळ, धुरंधर न्युज

जकराया प्रतिष्ठान व मोहोळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या पांल्यानी विविध परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान सोहळा शासकीय अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

जकराया प्रतिष्ठान व मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी पत्रकार बांधवांच्या विविध परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पाल्यांचा सन्मान सोहळा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी जकराया साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक करनेवाड, गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अलीकडे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत व त्यासाठी ध्येय वेडे होऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी बोलताना केले.

यावेळी कांतीलाल राऊत, अशोक कांबळे, राजकुमार शहा, अशोक पाचकुडवे, देविदास नाईकनवरे, चंद्रकांत देवकते, संजय आठवले, महेश सोहनी, अण्णा कांबळे, सुभाष शिंदे, भारत नाईक, बापूसाहेब काळे, शैलेश धोत्रे, किशोर मारकड, नसीर मोमीन, रजनीश कसबे, वसीम शेख, राजकुमार बाळसराफ, दशरथ रणदिवे, गोपाळ साखरे, गणेश चौगुले, नागनाथ शिंदे, आदित्य भालेराव, नानासाहेब वाघमोडे, प्रशांत सलगर, बाळासाहेब बनसोडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देविदास नाईकनवरे यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *