
पेनुर गावावर पसरली शोककळा
मोहोळ, धुरंधर न्युज
पेनुर (ता. मोहोळ) येथील टोल नाक्यावर आयशर टेम्पो ने धडक दिल्याने टोल नाका कर्मचारी हनुमंत (बिनु) अंकुश माने यांचा मृत्यू झाला असून सदरील घटना सोमवारी दि.9 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली.

याबाबत पंढरपूर शहर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेनुर ता. मोहोळ येथीलच युवक हनुमंत अंकुश माने (वय 38) हा मोहोळ पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या पेनुर येथील टोलनाक्यावर नाईट शिफ्टला कामावर होता. दरम्यान बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास टोल नाका चुकवण्यासाठी वेगाने येत असलेल्या आयशर टेम्पो ने हनुमंत माने यास धडक दिली. सहकाऱ्यांनी तात्काळ पंढरपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर सदरील आयशर टेम्पो सोलापूरच्या दिशेने गेला असून मोहोळ पोलीस स्टेशनचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे 1595 शेजाळ हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेने पेनुर गावावर शोककळा पसरली आहे.