पंढरपूर/धुरंधर न्युज
पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व आयएसओ प्रमाणित आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.पांढरे या उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य असून त्यांनी शिक्षण विषयांवर अनेक संशोधनपर लेख लिहिले आहेत. शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण विषयात त्यांना रूची आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पर्यावरण मित्र संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, पंढरपूर अध्यक्ष उज्वला शिंदे यांनी स्वागत आणि अभिनंदन केले आहे.