पेनुर- पापरी रस्त्याची लागली वाट, दुरुस्तीची मागणी, दुरुस्तीची मागणी

ग्रामस्थांनी दिले निवेदन

मोहोळ/धुरंधर न्यूज

मोहोळ तालुक्यातील पेनुर ते पापरी जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढली असल्याने दुचाकी वाहनधारकांच्या तोंडाला जखमा होत असून पुढील येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तरी सदरील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत पेनुर व पापरी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहोळ यांना निवेदन दिले असून यामध्ये म्हटले आहे की, पेनुर ते पापरी या गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून तो सरळ राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, मात्र सदरील रस्ता पूर्णपणे खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी सदरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती तसेच शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यासाठी वाहतूक अशक्य होऊ लागली आहे. यासह रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी चिलार, बाभूळ इत्यादी झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दुचाकी वाहनधारकांना काटे तोंडाला लागून जखमा होत आहेत. यासह पुढील वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, परिणामी पेनुर ते पापरी जाणाऱ्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून दोन्ही बाजूची वाढलेली काटेरी जोडपे काढावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


यावेळी पेनुर ग्रा. पं. सदस्य विठ्ठल माने, पापरीचे उपसरपंच रविराज भोसले, प्रगतशील बागायतदार देवानंद चवरे, सामजिक कार्यकर्ते तानाजी सावंत, लक्ष्मण चवरे, आकाश चवरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *