पैलवान समाधान पाटील यांनी केला राजन पाटील गटात प्रवेश

उमेश पाटील गटाला हादरा..

मोहोळ, धुरंदर न्यूज

मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या गटातील युवा समर्थक तथा धनगर समाजातील युवा कार्यकर्ते उप-महाराष्ट्र केसरी पै. समाधान पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला. दरम्यान रमेश बारसकर यांनी शरद पवार गटात तर समाधान पाटील यांनी लोकनेते परिवारामार्फत राष्ट्रवादी काँगेस मध्ये प्रवेश केल्याने उमेश पाटील गटाला हादरा मानला जात आहे.

नजिकपिंपरी येथील उप-महाराष्ट्र केसरी समाधान पाटील हे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील गटात कार्यरत होते. मात्र तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनगर येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या शुभहस्ते व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी समन्वयक रामदास चवरे, सरपंच संदीप पवार, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, उद्योजक वैभव गुंड, धनाजी व्यवहारे, शकील शेख, कुस्ती समालोचक धनाजी मदने, राजू अढेगावंकर, रवी शेळके, महावीर राऊत, सचिन पाटील, सोपान वाघमारे, सचिन वाघ, चंद्रकांत धोत्रे, उदय गायकवाड, भूषण शेख, काशिनाथ कदम, नरसिंग वाघमोडे, बबलू देवकते, लक्ष्मण पाटील, धोंडीराम निंबाळकर, सिद्धू रोटे, अण्णा बंडगर, बबलू देवकते, श्रीकांत शेंबडे, सर्जेराव पवार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जि प व पंचायत समिती साठी इच्छुक-

दरम्यान या प्रवेशनानंतर बोलताना पै. समाधान पाटील म्हणाले की, मोहोळ तालुक्यात येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आरक्षणाचा गट बघून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पैलवान समाधान पाटील यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *