माघ वारीतील १०८ च्या विभागाचे उत्कृष्ट सेवेचे होतेय कौतुक

पंढरपूर/धुरंधर न्युज

पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या माघ वारी एकादशी मध्ये अति तातडीची सेवा समजला जाणाऱ्या आरोग्य सेवेमध्ये १०८ विभागाने अतिशय चांगले नियोजन करीत अतिउत्कृष्ट सेवा दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या सेवेतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.


पंढरपूर शहरामध्ये नुकतीच माघ वारी एकादशी पार पडली. लाखोच्या संख्येने भाविक भक्त येथे उपस्थित होते. पर्यायाने वारकऱ्यांची संख्या जास्त असल्याने आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 108 विभागानेही उत्कृष्ट कार्य केले. दरम्यान एका घटनेत १०८ कंट्रोल रूम येथून फोन आला असता डॉक्टर सुनील व्हनमाने व पायलट नितीन जरग यांनी तात्काळ दखल घेऊन ६५ एकर येथुन भागाबाई काकडे यांना उपचारासाठी रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. माघ वारी एकादशी निमित्त पंढरपूर येथे आरोग्य सेवेसाठी सोलापूर 108 जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी आरोग्य सेवा देण्यात आली.


सामान्य माणसाला व प्रत्येक गोरगरीब भाविकांना कमीत कमी वेळात उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी अथक परिश्रम करणारे केवळ “रूग्णसेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रिद वाक्य मनात ठेवून जनसेवा करणारे डॉ. अनिल काळे 108 जिल्हा व्यवस्थापक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी माघावरी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भाविकांसाठी आरोग्यसेवा दिली असून यापुढेही या विभागामार्फत वारकऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्य सेवेची आमचा विभाग बांधील असल्याचे पायलट नितीन जरग यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *