माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केली विज उपकेंद्राची पाहणी..

पोखरापुरसह परिसरातील विजेचा प्रश्न सुटण्यासाठी होणार मदत

मोहोळ/ धुरंधर न्यूज

पोखरापुर (ता.मोहोळ) उर्जा विभाग जिल्हा कृषी धोरणा अर्तंगत ४ कोटी रुपयाचे ३३/११ केव्हीचे विज उपकेंन्द पोखरापुर या गावासाठी मंजुर झाले असुन त्या जागेची पाहणी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

यावेळी विज वितरणचे जिल्हा समन्वयक मोहन आलाट, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, भाजपा अनु जाती मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष संजीव खिलारे, पोखरापूरच्या सरपंच नंदा लेंगरे, उपसरपंच आशिष आगलावे, माजी सरपंच अंबादास माने, दाजी काकडे, तात्या काकडे, धोंडीबा उन्हाळे, किरण देशमुख, शितल देशमुख, सम्राट देशमुख ,बाळासाहेब देशमुख , निलेश गायकवाड, भास्कर जाधव, गणेश चव्हाण, सुभाष काळे, संजय काकडे, तात्या काकडे, विशाल गायकवाड, पांडुरंग कदम, धोंडीबा गायकवाड, महादेव यमगर, प्रेम गायकवाड, सिद्धेश्वर मांडवे, प्रवीण भोसले, अंकुश दळवे, सतीश कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गावरती मोहोळ पासून जवळ असलेल्या पोखरापूर गावाला गेली अनेक वर्षापासून शेतीसाठी कमी दाबाने वीज पुरवठा होत होता या बाबत गेली तीन-चार वर्षांपासून पोखरापूर येथे वीज कंपनीचे सब स्टेशन व्हावे म्हणून नागरिकांची मागणी होती. यासाठी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी सातत्याने माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने त्या ठिकाणी ३३/११  के व्ही चे विज वितरण उपकेंद्र मंजूर झाले असून त्यामुळे या परिसरातील पोखरापूर, आढेगाव, तांबोळे, खवणी, सारोळे आदीसह आठ गावातील शेतीच्या विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच या सब स्टेशनचे काम सुरू होईल, असे वीज वितरण चे जिल्हा समन्वयक मोहन आलाट यांनी यावेळी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *