मासे कुणी खाल्लेचे कारणावरून मामावर भाच्याने केला कुऱ्हाडीने हल्ला..

मोहोळ पोलीस ठाण्यात भाच्याविरोधात गुन्हा दाखल

धुरंधर न्युज –

घरी मासे खायला बोलवुन दारुच्या नशेत मासे पातेल्यात नसल्याने मासे कोणी खाल्ले, असे म्हणुन शिवीगाळी करुन भाच्याने मामाला कु-हाडीने डोक्यात व हातावर मारुन गंभीर जखमी केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी येथे दि.१५ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी भाच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास दगडू हेळकर रा. मसले (ता. मोहोळ) हे १५ मार्च रोजी घरी असताना त्यांचा भाचा गणेश विलास क्षीरसागर रा. मसले चौधरी हा घरी आला व आमच्या घरी चल, आईने काल रात्री मासे केले आहेत, आपण दोघे जण जेवण करु, असे म्हणाल्यावर फिर्यादी हेळकर हे भाच्यासोबत त्याचे घरी जेवण करण्यासाठी गेले. त्यावेळी भाचा गणेश हा दारु पिलेला होता. घरी गेल्या नंतर भाचा गणेश याने घरामध्ये जावुन माशाचे कालवण आणतो, असे म्हणाला. माशाचे कालवन आणत असताना पातेल्यामध्ये मासे नाहीत, मासे काय झाले? कुणी खाल्ले असे म्हणुन शिवीगाळी केली.

त्यावेळी गणेश यास हेळकर म्हणाले राहूदी कुणी तरी खाल्ले असतील, तरीही भाचा गणेश याने शिवीगाळी करत हातातील कु-हाडीने मामाच्या डोक्यात मारले तसेच उजव्या हातावर मारुन मला गंभीर जखमी केले. मारहाण झाल्यानंतर हेळकर हे बेशुद्ध होऊन पडले होते त्यानंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. याप्रकरणी मामा रोहिदास हेळकर यांनी भाचा गणेश क्षीरसागर याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला मोहोळ पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *