
युवा जागृती मंच चा उपक्रम
मोहोळ/धुरंधर न्युज
मोहोळ मध्ये प्रथमच आज दि.२१ जानेवारी रविवार रोजी युवा जागृती मंच आयोजित एक दिवशीय संविधान कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून एस.टी. स्टॅन्ड जवळील जिल्हा शिक्षक सोसायटीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यशाळेस प्रारंभ होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
या एक दिवशीय संविधान कार्यशाळेचे उदघाटन मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार फाटे हे असणार आहेत. याप्रसंगी गट विकास अधिकारी, आनंदकुमार मिरगिने, पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, डॉक्टर असोशिएशन मोहोळ, अध्यक्ष डॉ. शैलेश झाडबुके, ऍड. गोविंद पाटील, मराठा सेवा संघाचे तानाजी चटके, महावितरणचे माजी अभियंता शशिकांत ठोकळे, उद्योजक सुदर्शन कळसे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून यावेळी संविधान संवादक अमिर काझी असणार असल्याची माहिती युवा जागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष ऍड. आकाश कापुरे यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष संजय लोंढे, सचिव हरिभाऊ सरवदे, सदस्य भैय्यासाहेब कांबळे, महेश कारंडे, आनंद अवचारे, सागर रोकडे, अमर जानराव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.