युथ आयकॉन कृष्णराज महाडीक यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर साजरा.

वाढदिवस साजरा करण्याचा ‘महाडीक पॅटर्न’;

आठ जिल्ह्यांमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम; पंढरपूर विठ्ठल मंदिरात १५००० भक्तांना महाप्रसादाचे वाटप

महिलांसाठी उपक्रमांतून जपला अरुंधती महाडिक यांचा वसा; उपक्रमांद्वारे दिला सामाजिक संदेश

मोहोळ/धुरंदर न्यूज

राज्यसभा खासदार धनंजय महाडीक यांचे पुत्र अशी मर्यादित ओळख न ठेवता ज्यांनी स्वतची वेगळी ओळख निर्माण केली ते नाव आणि ओळख म्हणजे कृष्णराज महाडीक. संपूर्ण महाराष्ट्रात कृष्णराज हे KM या नावाने सुद्धा ओळखलं जातं. चॅम्पियन रेसर खेळाडू, प्रसिद्ध युट्यूबर, युथ आयकॉन, समाजसेवक अशी ओळख बनवणारे कृष्णराज महाडीक यांचा वाढदिवस एक नाही तर तब्बल ८ ते १० जिल्ह्यांमधील त्यांच्या फॅन्स व समर्थकांकडून विविध सामाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, लातूर, अहिल्यानगर, रत्नागिरी या विविध जिल्ह्यांमध्ये युथ आयकॉन कृष्णराज यांचा वाढदिवस उस्फूर्तपणे साजरा केला गेला. अन्नदान, महाप्रसाद वाटप, रिक्षासाठी दरवाजे वाटप, रुग्णांना फळे वाटप, निराधार व गरजूंना धान्य वाटप, समुद्र किनारा व किल्ला स्वच्छता, वेश्या व्यवसायातील महिलांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, सॅनिटरी पॅड वाटप असे विविध उपक्रम घेण्यात आले.

चॅम्पियन कृष्णराज यांनी खेळापूरतेच मर्यादित न राहता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत युट्यूबच्या माध्यमातून लाखोंचा समुदाय जोडला आहे. युट्यूबकडून येणाऱ्या पैस्यांमधुन ते अनेकांना सढळ हाताने मदत करत असतात. केवळ स्वतः मदत न करता त्यांच्या फॉलोअर्सना देखील ते समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा देत आवाहन देखील करत असतात. कृष्णराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत फॅन्स व समर्थकांकडून हे कार्यक्रम राबवण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या १५००० वारकरी भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे ग्रामदैवत लिंगेश्वर मंदिर येथे ५००० लोकांना महाप्रसाद अन्नदान करण्यात आले. कोल्हापूर येथे प्रवाशांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी रिक्षा झडप दरवाजाचे वाटप करण्यात आले. शेकडो रिक्षा चालकांचा यामुळे मदत होणार आहे, त्यासाठी त्यांचा होणारा खर्च वाचणार आहे. शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे जनजागृती करत महिलांसाठी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. निराधार, अनाथ व गरजुंना बिर्याणी वाटप करण्यात आले. भक्तिवेदांत स्वामी रोड, जुहू मुंबई येथे कूपर हॉस्पिटल येथील रुग्णांना फळेवाटप करण्यात आले. सांगली येथील फॅन्स कडून गरजुंना धान्य वाटप उपक्रम राबवण्यात आला.

समुद्र किनारा व किल्ला स्वच्छता, वृक्षारोपण याउपक्रमांद्वारे दिला सामाजिक संदेश:-

सिंधुदुर्ग येथील के एम फॅन्सनी उस्फुर्त सहभाग नोंदवत समुद्र किनारा स्वच्छता उपक्रम राबवला. ११ जून रोजी सकाळी सर्वांनी समुद्र किनारा गाठला, किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बॉटल इतर पॉलिथिन कचरा गोळा करत पर्यटकांमध्ये जनजागृती केली. सोबतच देवगड किल्ला स्वच्छता करत गड संवर्धनाविषयी देखील जनजागृती केली. नाशिक येथे एक फॅन, एक झाड असा उपक्रम राबवत शेकडो फॅन्सकडून वृक्षारोपणाद्वारे आपल्या लाडक्या KM यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत एक सामाजिक संदेश देण्यात आला.

अरुंधती महाडिक यांचा आदर्श जपत महिलांसाठी राबवला स्तुत्य उपक्रम:-

महिला सबलीकरणासाठी अरुंधती महाडिक यांच्या योगदानाबद्दल आपण सर्वजण जाणून आहोत. महिला स्वयंरोजगार व गृह उद्योग या करिता त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो महिलांना त्यांनी मदत, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल आहे. त्यांच्याच कार्याचा कित्ता गिरवत महिलांमध्ये सॅनिटरी पॅड विषयी जागृती करत शिवाजी पेठ कोल्हापूर येथे सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. एवढंच नाही तर त्याही एक पाऊल पुढे जात समाजातील उपेक्षित घटकांपैकी एक असणाऱ्या वेश्या व्यवसायातील महिला भगिनींसाठी पुणे येथे आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आले. आई अरुंधती महाडिक यांचा महिला वर्गासाठी सुरु असलेला समाजकार्याचा वसा कृष्णराज पुढे घेऊन जात आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *