राष्ट्रिय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी शंकर वाघमारे यांची निवड..

मोहोळ/धुरंदर न्यूज

सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रिय डाळिंब संशोधन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे .
केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री व भारतीय कृषी अनुसंधान परिषद ( ICAR) नवी दिल्ली यांच्या शिफारशीने आगामी तीन वर्षा साठी ही निवड करण्यात आली आहे.


मोहोळ तालुक्यातील सोंदने येथील शंकरराव वाघमारे यांचे पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सामाजिक. राजकीय कारकिर्द सुरू झाली . भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून १० वर्ष पक्ष संघटनेत काम केले नंतर त्यांना दोन वेळा मोहोळ तालुकाध्यक्ष म्हणून १९९५ ते १९९९ या काळात संधी मिळाली. तसेच ३ वेळा जिल्हा सरचिटणीस
, तीन वेळा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्य परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, संजय गांधी निराधार समिती सदस्य, सौंदणे (ता.मोहोळ) ग्रामपंचायत सरपंच, माळी महासंघाचे किसान आघाडी चे प्रदेशध्यक्ष आदी पदावर काम केले आहे. ते सतत ३८ वर्ष भाजपा मध्ये सक्रिय काम करीत आहेत.
पक्षाने अनेकदा त्यांचेवर अनेक निवडणुकीची जबाबदारी दिली होती. २००८ व २०१४ विधानपरिषद, २००९ ची अक्कलकोट विधानसभा, २०१४ ची सोलापूर लोकसभा आदी वेळी त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. सामुदायिक विवाह, रक्तदान शिबिर, यापूर्वी अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या निवडीबद्दल भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिह मोहिते पाटील, माजी खासदार ॲड. शरद बनसोडे, किसान आघाडीचे प्रदेशध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा किसान आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस शंभुसिंग आदींसह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *