प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोहोळ/धुरंधर न्युज
जिल्हा परिषद शाळा, जरग वस्ती कोन्हेरी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन जरग यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. यावेळी नूतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन जरग यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शेळके, अभिमान शेळके, रामचंद्र शेळके, निलेश जरग, अशोक शेळके, भारत शेळके, राजकुमार माने, दिपक जरग,रविराज देवकते, रविकांत शेळके, आश्विनी माळी, सिमा शेळके, सुनिता शेळके, शकुंतला माने, अस्मिता कांबळे, प्रतिभा नवगिरे आदींसह नागरिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते.