संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांचा विश्वास
सोलापूर/धुरंधर न्युज
गेल्या दोन वर्षात शिव स्वराज्य जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बांधकाम व इतर बांधकाम मजूर कामगार, माथाडी, मापाडी कामगार ,सुरक्षा रक्षक यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणारे संघटित व असंघटित कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात संघटनेला मोठे यश प्राप्त झालेले आहे. यापुढील काळात ही संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार असणारा असून प्रामुख्याने अंशकालीन स्त्री परिचर यांचे सुद्धा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी न्याय मिळवण्यासाठी एकत्रित एकाच छताखाली आंदोलन करून यश पदरात पाडण्याचा संकल्प संघटनेच्या माध्यमातून आम्ही केला असल्याचे प्रतिपादन शिवस्वराज्य जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांनी केले.
शिवस्वराज्य जनरल कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेचा दुसरा वर्धापन दिन जवळपास प्रमुख पदाधिकाऱ्यांसह एक हजार महिला व पुरुष कामगार सभासद यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील बोलत होते. दरम्यान कार्यक्रमाच्यापसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक चेतन नरोटे यांनी उपस्थित राहून शिवस्वराज्य संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन संघटनेच्या आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील तसेच श्रीमती रेखाताई शिवाजीराव कांचन पाटील, संचालक प्रशांत कांचन पाटील, संग्राम भोसले व इंदुमती भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून मृत्यू प्रस्ताव, शैक्षणिक प्रस्ताव व इतर विविध प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून कामगार व त्यांच्या वारसदारांच्या खात्यावरती जवळपास साडेचार करोड रुपये येण्यासाठी संघटनेने शर्तीचे प्रयत्न करून मोठा दिलासा दिला आहे. पुढील वर्षी तिसऱ्या वर्धापन दिना पर्यंत कामगारांचे प्रश्न सोडवत असताना अंशकालीन स्त्री परिचर यांचे सुद्धा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी न्याय मिळवण्यासाठी एकत्रित एकाच छताखाली आंदोलन करून यश पदरात पाडण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला.
यावेळी संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती भोसले, उपाध्यक्ष मंगल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण शिरसट, सुरक्षा रक्षक जिल्हाध्यक्ष सचिन पवार, दीप्ती कोलगे, आशा सुतार, निलेश भोसले, महेश भोसले, शाम गुरव, श्रीकांत मोटे, साधना मोटे, मिरा कस्तुरी, वर्षा माने, स्वाती चव्हाण, शिवाजी लंबे आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.