मोहोळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सीमाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली असून अशा आशयाचे पत्र सचिव अनिल देसाई यांनी प्रसिद्ध केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सचिव अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. यामध्ये मोहोळ नगरपरिषद शिवसेना माजी नगरसेविका सीमाताई पाटील यांच्याकडे मोहोळ तालुक्यासह बार्शी आणि मंगळवेढा या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला जिल्हा संघटक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सीमाताई पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. या संधीच नक्कीच शिवसेना पक्ष वाढीसाठी माझे शंभर टक्के योगदान असेल असे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान या निवडीबद्दल शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, महिला संपर्कप्रमुख संजना गाडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, ज्येष्ठ नेते दिपक गायकवाड, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी अभिनंदन केले.