
आर जे सामाजिक संस्थेचा उपक्रम
मोहोळ/धुरंधर न्युज
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ कोन्हेरी ता. मोहोळ येथे आर जे युवा मंच सामाजिक बहुउद्देशीय संस्था च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११६ रक्तदात्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे आर जे युवा मंच सामाजिक बहुउद्देशीय संस्था तसेच आर जे फाउंडेशन च्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये ११६ रक्तदात्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. प्रारंभी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक रामदास जरग, ग्रामपंचायत सदस्य प्रा. राजकुमार पाटील, माजी उपसरपंच बाबुराव शेळके, हरिदास माळी मेजर, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज कांबळे, शिवाजी गाडे, मारुती माने, भारत माळी, भास्कर शेळके, संतराम जरग, गोरख लवटे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी अज्ञान शेळके, दत्तात्रय मुळे, हरिदास माने, प्रा. रमेश चव्हाण, परमेश्वर माने, अध्यक्ष संदीप जरग, उपाध्यक्ष राहुल तांबिले, सचिव महादेव माने, नितिन सुभाष जरग, अशोक शेळके, गणेश शेळके, दीपक जरग, अविनाश सुतार, दादा गोरे, अक्षय ब्लड बँकेचे अजय रुपनर आदींची प्रमुख उपस्थिती होती.