आमदार शहाजी पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेची शान राखली. नागेश वनकळसे

खा.विनायक राऊतांनी मानदेशी भाषेची दोन वाक्ये बोलावी.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे  एकमेव आमदार शहाजी बापू पाटील आहेत, त्यांनी शिवसेनेची शान सोलापूर जिल्ह्यात  २०१९ च्या विधानसभेत राखली ते आमदार झाले नसते तर सोलापूर धनुष्य बाणाचा आमदार दिसला असता का?  आमदार शहाजी पाटील यांनी मानदेशी भाषा “मानदेशी माणसे “कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगुळ यांच्या नंतर साता समुद्रापार पोहोचवली, तुम्ही त्यांना वाईट बोलून उरला सुरला जनाधार गमावून बसाल, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना मोहोळ विधानसभेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी मारला.

पुढे बोलताना वनकळसे म्हणाले की, आमदार शहाजी बापू हे स्वकर्तुत्वाने मोठे झालेले व दुष्काळी भागाच्या वेदना घेऊन जगलेले शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे ,अनेकदा खिलाडू वृत्तीने पराभव पत्करून विरोधकांचा आदर करत तावून सुलाखून सर्वसमावेश आणि सगळ्यांचा आदर करणार हे नेतृत्व आहे,विकासात आत्ममग्न असणार आणि आपल्या माणसात रमणाऱ्या लोकांची चेष्टा खासदार विनायक राऊत करत आहेत वास्तविक ज्यांच्यामुळे आपलं घर फुटलं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबद्दल न बोलणं म्हणजे साफ वेडेपणा आहे आपली शिवसेनेची माणसं आणि शिवसैनिक  भाजपा  ने नाहीतर राष्ट्रवादी ने मारली आहेत याचा दाखला इतिहासातून घ्यावा ,शिवसेनेच्या रोपट्याला जे रक्त लागले आहे ते रक्त  राष्ट्रवादी ने सांडले आहे त्या विचारधारेचे आहे त्यामुळे विनायक राऊतांनी  उगाच पक्ष प्रेमाचा पुळका आणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा राजकीय प्रवास सुलभ करून देऊ नये, अशी जळजळीत टीका नागेश वनकळसे यांनी केली.

गेल्या अडीच  वर्षात शिवसैनिकांची काय अवस्था  झाली कुणी विचारलं का ? राष्ट्रवादी ने किती शिवसैनिक मारले ,किती जणांच्या तडीपारी केल्या, किती शिवसैनिकांना मोका लावला याची गृह विभागातून चौकशी खासदार विनायक राऊतांनी करावी या अन्यायाच्या वेळी आम्हाला मदत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली , ज्यावेळेस तुम्ही पुढील निवडणूका महाविकास आघाडीतून म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढायचे लढायचे म्हणाल त्यावेळेस तर आपली अवस्था काय होईल याची किमान कल्पना करा, उरली सुरली सहानुभूती हरवून बसाल, त्यामुळे रोज उठून तोंड सुख घेऊ नये, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे व धर्मवीर आनंद दिघे यांचे शिवसैनिक समर्थ आहेत, असे रोखठोक मत नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *