मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील श्री. खंडोबा देवस्थान मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार यशवंत माने यांच्या आमदार निधीतून १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या सभामंडपाचे भुमिपूजन ह.भ.प. हरिदास (आबा ) राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी पं.स. सदस्य शहाजी मोटे, मेजर रामचंद्र गरड, दत्तात्रय सोनार, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब राऊत, दिलीप मोटे, पांडुरंग राऊत, सचिन शिंदे, शाहु धोत्रे, दयानंद राऊत, प्रकाश राऊत, हरिभाऊ खंदारे, उत्तम मोटे, दादा राऊत, अशोक मोटे, चंद्रकांत भडंगे, महादेव जाधव, अप्पा जगताप, राहुल कसबे, भिमराव पाटील, ज्ञानेश्वर ताकमोगे, आबासाहेब कदम, संभाजी राऊत, राऊ राऊत, दत्तात्रय उबाळे, विजय राऊत, नवनाथ राऊत, बापू उबाळे, ज्ञानोबा पाटील, सागर पवार, समाधान खंदारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.