पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पब्लिक स्कुल शेळवे येथे आज शालेय उपक्रमाअंतर्गत ” आषाढी वारी ” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे सर्व विद्यार्थी वारकरी आणि संतांच्या पोशाखात या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवत होते. छोटे विठोबा, रुक्मिणी, संत आणि डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या मुली यांनी सौंदर्यात भर घातली. ज्ञानोबा तुकोबांच्या नामाच्या गजरात सुरू झालेली ही दिंडी, कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात नेण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिक, पालक, आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यानंतर ह. भ. प. चव्हाण महाराज यांचे कीर्तन झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक सिब्बनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कष्ट घेतले.