वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कडून घेतली यात्रेच्या बाबतीतची माहिती
पंढरपूर/ धुरंधर न्यूज (राजाभाऊ आटकळे)
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पंढरपूर येथे आढावा बैठक घेतली. सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी सोमवारी पंढरपूरला भेट दिली आणि शहराची पाहणी करून यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.शिरीष सरदेशपांडे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन त्यांनी दर्शन घेतले.
यासह त्यांनी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची रुक्मिणी पोलिस संकुल येथे बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोनि. धनंजय जाधव,पोनि. अरुण फुगे, पोनि. मिलिंद पाटील, सपोनि. सी. व्ही. केंद्रे, सपोनि. प्रशांत भागवत, सपोनि. कपिल सोनकांबळे, सपोनि. मनोज सोनवलकर, सपोनि. आकाश भिंगारदेवे यांच्यासह अन्य अधिकार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी यात्रा कालावधीत बंदोबस्ताची माहिती घेतली.
सरदेशपांडे यानी यात्रेत कशा प्रकारे बंदोबस्त असतो, गर्दीवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते. महाराज मंडळींनी कशा पध्दतीने संपर्क केला जातो. याची देखील माहीती जाणून घेतली. चंद्रभागा नदी परिसर, महाद्वार घाटे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील गोपाळकृष्ण मंदीरास जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भेट दिली व परीसराची घेतली माहिती.
जिल्ह्यात पंढरपूरचा पांडुरंग, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ, तुळजापूरची तुळजाभवानी यांच्या दर्शनासाठी परराज्यातून येणाऱ्या भाविकांना व वाहनांना होणारा पोलिसांकडूनचा त्रास सहन केला जाणार नाही . तसेच अवैध धंदे चालकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे ते सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंदे, वाळूचोरी, तसेच शहर व तालुक्यातील घडामोडीवर ते जातीणे लक्ष ठेवून असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.