मोहोळ/धुरंदर न्यूज
मोहोळ तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी गणेश काकडे ढोकबाबुळगाव यांची निवड झाली असून ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या हस्ते देण्यात आले.
ढोक बाबुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश काकडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची ग्राहक समितीच्या मोहोळ तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या ते देण्यात आले. निवडी नंतर काकडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ, तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष बबनराव नरोटे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष नानासाहेब मोरे, तालुका महिला अध्यक्ष लताताई पाटील, तालुका उपाध्यक्ष पप्पू पाटील, महादेव जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.