किरकोळ कारणावरून मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एकाने आपल्या पत्नीस चाबूक व चपलाने बेदम मारहाण करून गेल्या दोन वर्षापासून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याच्या करणावरून एका विवाहितेने स्वतःसह मुलीची गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली असून या घटनेने मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय २५) तर आरोही विजयकुमार माळगोंडे (वय ४) अशी मयताची नावे आहेत.
याबाबत कामती पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतीचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे याच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती व विजयकुमार हे दापत्य त्यांच्या शेतातील घरात राहत होते. त्यांना मुलगी आरोही (मयत) व मुलगा बसवराज असे दोन मुले होती. दरम्यान या दांपत्याने सोमवारी सकाळी दहा वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घातला होता.
त्यानंतर दुपारी तू भाऊ ‘मल्लिनाथ याला का फोन केला’ म्हणून तिला चाबकाने व चपलाने बेदम मारहाण करून धमकी दिली होती. धमकी देऊन तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेला होता. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत शिवाय नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र जागी असलेली मुलगी आरोही हिस प्रथमता गळफास लावला. व नंतर स्वतः पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद प्रीती तिचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरुळे रा.हत्तूर ता. दक्षिण सोलापूर यांनी कामती पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. दरम्यान बसवराज नावाचा छोटा मुलगा सदरचे कृत्य होताना तो झोपला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रीतीच्या डोक्यात बसवराज बद्दल कोणतेच विचार आले नाहीत. त्यामुळे तो वाचला.
या घटनेची माहिती कळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. कामती प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाविच्छेदन करून मयत मायलेकीला एकाच चितेवरती अंत्यसंस्कार देण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मयताचे पती विजयकुमार माळगोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. असून पुढील तपास कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.