मोहोळ, धुरंधर न्यूज
रिकव्हरी चांगली असल्यास कारखान्याला चांगला भाव देणे परवडणारे असते, त्यामुळे या हंगामात ऊस उत्पादक सभासदांनी आपला चांगल्या प्रतीचा ऊस देऊन कारखान्याला सहकार्य करावे, या गळीत हंगामात एफ आर पी नुसार रिकव्हरी बेसवर शेतकऱ्यांना चांगला दर देण्यात येणार असून दोन हंगामापूर्वीचे प्रति ५० रुपये प्रमाणे हप्ता दीपावलीसाठी देणार असल्याचे प्रतिपादन जकराया साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन ऍड. बिराप्पा जाधव यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर या साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन बिराप्पा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले की, चालू गळीत हंगामाची कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून २०० ट्रॅक्टर टोळ्या, १९० डम्पिंग,५५० बैलगाडी व १० हार्वेस्टर मशीन इतक्या यंत्रणेचा करार पूर्ण करून ७५ टक्के यंत्रणा तोडणीसाठी हजर झाली आहे. चालू हंगामामध्ये पाच लाख मेट्रिक टन ऊस गळफाचे उद्दिष्ट असून नोंदी झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार असून एफ आर पी प्रमाणे दर अदा करावयचा असून सुरुवातीस को-८६०३१ या वाणास प्राधान्य देऊन ऊस तोडणी प्रोग्रॅम सुरू करणार आहोत, परिणामी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता जकराया कारखान्यावर विश्वास ठेवून कारखान्यात गळीतासाठी जास्तीत जास्त ऊस द्यावा, असे आवाहन ही यावेळी कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी केले.
यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक राहुल जाधव, जकराया मल्टीस्टेट बँके च्या सीईओ मनीषा जाधव, प्रगतशील बागायतदार रफिक पाटील, प्रभाकर पाटील, श्रीधर माने, सिद्धेश्वर मोरे, हरिभाऊ घुले, नंदकुमार आतकरे, भानुदास गावडे, बिरू जाधव, तानाजी गुंड, शेती अधिकारी नानासाहेब बाबर, कुबेरदास करूबरणें, सुब्राव पडसाळकर, बंडोपंत साठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केन मॅनेजर विजय महाजन यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी जकराया वाघमारे यांनी मानले.