धुरंधर न्यूज
केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत ९ ते १४ वयोगटातील बालकामगार मुलांच्या पुनर्वसणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्येक्षतेखाली जिल्हात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सुरू करण्याकामी केंद्रशासनाच्या दिशा निर्देशानुसार तृतीय पक्ष (third party) सर्वेक्षणाचे काम नेहरू युवा केंद्र, सोलापूर यास देण्यात आले होते. सर्वेक्षण करत्यास नेहरू युवा केंद्र,सोलापूर यांच्या मार्फत अनुभवी प्रशिक्षका कर्वी प्रशिक्षण देण्यात आले होते.
सदर सर्वेक्षण एकुण ९१ महिला व पुरूषानी मिळून संपुर्ण सोलापूर जिल्हातील बालकामगार मुलांचे सर्वेक्षण नेहरू युवा केंद्रा मार्फत दि. 14 ते 18 फेब्रुवारी 2022 अखेर यशस्वीरित्या पुर्ण केले. सदरील सर्वेक्षण पुर्ण होऊन सुध्दा गेली सात- आठ महिने झाले तरी सर्वेक्षण कर्त्यास सर्वेक्षणाचे मानधन नेहरू युवा केंद्रा मार्फत मिळत नव्हते. सदरील सर्वेक्षण पुर्ण जिल्हात उन्हातान्हात फिरून केले असताना सुध्दा मानधना पासून वंचित होते. सर्वेक्षण कर्त्यावर अखेर उपासमारीची वेळ आली होती. शेवटी सर्वेक्षणकर्ते यांनी जावेदभाई पटेल, सोलापूर जिल्हा सचिव बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) यांना भेटून आपल्या व्य था मांडल्या व दिवाळी सणापुर्वी मानधन मिळावे अशी विनंती केली.
जावेदभाई पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलव्दारे बालकामगाराच्या झालेल्या सर्वेक्षणाचे मानधन तात्काळ मिळण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री कार्यालयांनी या मेलची दखल घेत जिल्हाधिकारी सोलापूर यांना यामेलची दखल घेण्याविषयी मेलव्दारे कळवले. तसेच जावेदभाई यांनी आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांना फोनव्दारे सर्व हकिगत सांगितली असता ताना जी सांवत यांचे स्विय सहा य्यक लटके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संर्पक साधून जिल्हाधिकारी यांना या विषयी लक्ष घालण्याविषयी सांगितले.
जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ संजय गांधी योजनेचे अधिकारी अजंली मरूड यांना मानधन का थांबले आहे यांची चौकशी करून त्वरीत मानधन अदा करण्याचे आदेश दिले. अजंली मरूड यांनी संबधित अधिकाऱ्याना बोलावून सविस्तर चौकशी करून दिवाळीपुर्वी मानधन अदा करण्याच्या सुचना नेहरू युवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना केल्या. दिवाळीपुर्वी नेहरू युवा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणकर्त्याच्या खात्यात मानधन जमा केले अखेर सर्वेक्षणकर्त्याच्या घरी दिवाळी साजरी झाली.
सर्वेक्षणकर्त्यानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सांवत तसेच जिल्हा सचिव जावेदभाई पटेल यांचे मनापासुन आभार मानले.