तालुक्यातील जि.प व पं.स प्रारुप प्रभाग रचना चुकीची

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम सन २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेवर आज दि. १५ जून रोजी पुणे विभागीय आयुक्त साहेब यांचे समोर हरकत घेतलेल्या नागरीकांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. यावेळी मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणातील प्रारुप प्रभाग रचना चुकीची असून यावर भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश – सोशल मीडिया प्रभारी तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव खिलारे यांनीही हरकत नोंदवून आपले लेखी म्हणणे दिले.

हरकतीतील मुद्दे असे, १)निर्वाचक गणाची रचना करताना पूर्वीचे प्रगणक गट फोडू नयेत, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असताना देखील मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सन् २००२ ते सन् २०२२ पर्यंत प्रभाग रचना करताना वारोंवार प्रगणक गट फोडण्यात आले आहेत, याकडे मा. आयुक्तांचे लक्ष वेधले. आणि सध्याच्या सन् २०२२ च्या निवडणुकीत प्रारुप प्रभाग रचना करताना देखील यापूर्वीचे सन् २०१७ चे प्रगणक गट फोडण्यात आले असून प्रसिद्ध केलेल्या नकाशात रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, नाले, नद्या, सिटी सर्वे नंबर उड्डाणपूल आदी नैसर्गिक, भौगोलिक सीमांचा व ठिकाणांचा उल्लेख केलेला नाही. तसेच प्रारुप प्रभाग रचना करताना भौगोलिक सीमा विचारात न घेता सदोष व चुकीच्या पद्धतीने प्रगणक गट फोडले असल्याने सदरची सदोष प्रारूप प्रभाग रचना रद्द करून नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्यात यावी.

२) लोणंद- पंढरपूर -मोहोळ पालखी महामार्गाच्या उत्तरेकडे असलेले “सारोळे” हे गाव सन् २०१७ च्या निवडणुकीत “पोखरापूर” गणा मध्ये होते. परंतु सध्याच्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये सारोळे गावाचा समावेश भौगोलीक सिमांचा विचार न करता पंढरपूर- मोहोळ पालखी महामार्गाच्या दक्षिणेकडील “पेनुर” गणात समावेश केला असल्याने “सारोळे” गाव पूर्वीप्रमाणे “पोखरापूर गणात” ठेवण्यात यावे आणि त्या बदल्यात सन् २०१७ च्या प्रभाग रचने प्रमाने “तांबोळे” गावचा समावेश”पेनूर” गणात करावा. तसेच बिटले गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ च्या उत्तरेकडे असून पोखरापूर गणाची नैसर्गिक रचना पाहता “बिटले” गाव पोखरापूर गणातून काढण्याचे यावे..

३) सध्याच्या सन् २०२२ च्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये भौगोलिक सलगता येण्यासाठी “सिना नदीचे” पश्चीमेकडील गोटेवाडी, मुंडेवाडी, नांदगाव हि गावे ५४. सय्यद नरवडे गणास जोडण्यात यावीत.

४) तसेच प्रगणक गणातील लोकसंख्या जास्त असलेल्या गावाचे नाव त्या त्या प्रगणक गणाला देण्यात येते. परंतू सध्याच्या क्र. ५० “मसले चौधरी” (लो.२७७७) गणापेक्षा “कोळेगाव” गणाची लोकसंख्या (३४५३) जास्त असल्याने सदर गणास मसले चौधरी ऐवजी “कोळेगाव गण” असे नाव देण्यात यावे.

अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव खिलारे यांनी विभागीय आयुक्त – पुणे यांचेसमोर सुनावणी वेळी केली आहे. दरम्यान या हरकती वर काय निर्णय होतोय?, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *