तालुक्यातील रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी चक्क आरोग्यमंत्री ससून रुग्णालयात

हॉस्पिटल प्रशासनाला धरले धारेवर

मोहोळ तालुक्यातील रुग्णाच्या तक्रारीनंतर आडमुठ्या ससून रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरत रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी चक्क राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुणे येथील ससून रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान कॅबिनेट मंत्र्यांच्या अचानक भेटीने हॉस्पिटल प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. रुग्णांबाबत सिरीयस नसलेल्या प्रशासनाला यावेळी त्यांनी धारेवर धरले.

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावातील रहिवासी युवक आकाश रवींद्र जाधव ह्याला ऑपरेशन साठी सोलापूर येथे मोठा खर्च सांगितला होता. म्हणून त्यास पुणे येथे उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. मात्र त्याच्या आजाराबद्दल गंभीरता न दाखवता प्रशासनाने दोन दिवस टाळाटाळ करण्याचा प्रकार केला. ही गंभीर बाब राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ ससून रुग्णालय येथे धाव घेत हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत धारेवर धरले. तर सदरील रुग्णाला स्वतः ऍडमिट करून त्याच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले. तर हॉस्पिटल परिसरात फुटपाथवर वाऱ्यावर सोडून देणाऱ्या रुग्णाबाबत गंभीरता न दाखवल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरत याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसले.

दरम्यान याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नूतन सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे बोलताना म्हणाले की, शेतकरी, रुग्ण, सर्वसामान्य नागरिक, महिला, गरजू लोकांना कायमच मदतीचा हात देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राज्याचे कॅबिनेट मंत्री तानाजीराव सावंत यांच्या विचाराने प्रेरित होऊच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असून यापुढेही ना. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य गरजू लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी कार्यतत्पर असल्याचेही नूतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सांगितले.

यावेळी टाकळीचे याराना ग्रुपचे अध्यक्ष अक्षय गायकवाड, अविनाश गायकवाड, अमोल गायकवाड, समाधान क्षिरसागर, बबलू गायकवाड, सागर गायकवाड आदि उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *