देवडी येथे ७ मे रोजी अक्षरसंस्कार गुरुकुल चे वास्तुशांती व भव्य उदघाटन समारंभ

मान्यवरांच्याउपस्थिती मध्ये होणार कार्यक्रम

देवडी (ता. मोहोळ) येथे अक्षरसंस्कार गुरुकुल चे वास्तुशांती व भव्य उदघाटन समारंभ कार्यक्रम दि.७ मे रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील देवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अक्षरसंस्कार गुरुकुलची स्थापना नितीन डोंगरे यांनी केली असून त्या इमारतीचा वास्तुशांती व उदघाटन समारंभ कार्यक्रम दि.७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष विजयराज डोंगरे, शांतिनिकेतन गुरुकुलचे संस्थापक दत्तात्रय कोंडलकर, मेष्टा संघटनेचे अध्यक्ष गणेश नीळ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव, कामगार आयुक्त नीतीन कवले, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, संशोधन सहाय्यक श्रीकांत शेटे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोज मोरे यासह टिकटॉक स्टार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून पालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अक्षर संस्कार गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *