ना.प्रा. तानाजी सावंत यांचा प्रशांतबापू भोसले यांच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रीमंडळात नव्याने नियुक्ती झालेबद्दल ना. प्रा. तानाजीराव सावंत यांचा सन्मान सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रशांत बापू भोसले यांच्या वतीने करण्यात आला.

दि.९ ऑगस्ट रोजी राजभवन येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये सोलापूर जिह्याचे सुपुत्र ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. या निवडीबद्दल मुंबई येथे जाऊन मोहोळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते प्रशांत बापू भोसले यांनी नूतन कॅबिनेट मंत्री सावंत यांचा सन्मान करून पुढील विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान ना. तानाजीराव सावंत हे कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांच्याकडून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, असा आशावाद शिवसेना नेते प्रशांत बापू भोसले यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते मनीषआण्णा काळजे, नामदेव महाराज काळे, सुनील क्षीरसागर हे होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *