आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे उभे राहण्याचे मनसुबे फेल
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत दि.२८ रोजी पंचायत समिती सभागृहामध्ये निरीक्षक उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. दरम्यान ओबीसी आरक्षणासह झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये मीच निवडणूक लढवणार, असे म्हणीत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका कधी लागणार? याची उत्सुकता ग्रामीण भागामध्ये लागून राहिली होती. अखेर हे आरक्षण सोडत गुरुवार दि.२८ जुलै रोजी मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान निरीक्षक उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. तालुक्यात ६ जिप गट व १२ पंस गण अस्तित्वात असून लोकसंख्येच्या आधारे प्रशासनाकडून ओबीसी आरक्षणासह ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
नव्याने जाहीर पंचायत समिती आरक्षण पुढीलप्रमाणे-
१) आष्टी पंचायत समिती गण- सर्वसाधारण
२) खंडाळी पंचायत समिती गण- अनुसूचित जाती महिला
३) नरखेड पंचायत समिती गण- सर्वसाधारण
४) शिरापूर सो पंचायत समिती गण- सर्वसाधारण महिला
५) कामती बुद्रुक पंचायत समिती गण- सर्वसाधारण
६) सावळेश्वर पंचायत समिती गण- अनुसूचित जाती सर्वसाधारण
७) पोखरापूर पंचायत समिती गण- ओबीसी महिला
८) सय्यद वरवडे पंचायत समिती गण- सर्वसाधारण महिला
९) पेनूर पंचायत समिती गण- ओबीसी महिला
१०) टाकळी सिकंदर पंचायत समिती गण- सर्वसाधारण
११) कुरुल पंचायत समिती गण – ओबीसी सर्वसाधारण
१२) घोडेश्वर पंचायत समिती गण- सर्वसाधारण महिला