लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर व देशामध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन वर्षभर केले जात आहे. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाज जागृतीच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या साहित्य कृतीला अभिवादन करण्यासाठी रशियाची राजधानी मौस्को मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण व अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही खरोखरच आपल्या देशासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे .याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत पोखरापूर येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व समाज बांधव यांच्या वतीने गौरव मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी सर्व ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन राज्य शासनास सादर करावेत असे आवाहन आपल्या मनोगतातून सत्यवान खंदारे यांनी केले. तसेच श्रीधर उन्हाळे व संतोष मोरे यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगितली.
यावेळी सरपंच नंदा लेंगरे, उपसरपंच आशिष आगलावे, ग्रामपंचायत सदस्या शामल खंदारे, चेअरमन हर्षद दळवे, उद्योजक दत्तात्रय काकडे, आप्पाराव खंदारे, ब्रह्मदेव माने, रघुनाथ झांबरे, दत्तात्रय खंदारे, अंकुश दळवे, बालाजी उन्हाळे, दुर्योधन खंदारे, श्याम खंदारे, सुधीर खंदारे, मोहन खंदारे, गोपाळ खंदारे, प्रकाश खंदारे , शरद खंदारे, देवा खंदारे, सामाजिक कार्यकर्ते युवराज रणदिवे, तानाजी खिलारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान खंदारे यांनी केले तर आभार सुधीर खंदारे यांनी मानले.