अनगर/धुरंधर न्युज
आटपाडी तालुक्यातील पिसेवाडी येथील ग्रामीण भागातुन रअसणार्या कु. प्रगती सर्जेराव पिसे या विद्यार्थीनीने राज्य कर निरीक्षक पदाचे परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
नुकताच या परिक्षेचा निकाल जाहिर झाला असुन कु. प्रगती माध्यमिक शिक्षण अनगर ता. मोहोळ येथील कै.शंकरराव बाजीराव पाटील महाविद्यालय याठिकाणी झाले आहे. या परिक्षेत कु. प्रगती विशेष प्राविण्य मिळविलेबद्दल माजी आ.राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील, मुख्याध्यापक चंद्रकांत ढोले, शिक्षक खरात, चोपडे, श्रीकांत कवितके यांनी अभिनंदन केले आहे.