प्रहार हा दुर्लक्षित घटकांसाठी काम करणारा पक्ष : वैभव जावळे
मोहोळ ते कुरुल मार्गे विजापूर हायवे वरती खूप काटेरी झाडे आले होते. या काटेरी झाडांचा वाहनचालकांना खूप त्रास होत होता. ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणी तर समोरून आलेली वाहने दिसत नव्हती, प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे हे मोहोळ ला जाताना त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी लगेच नॅशनल हायवे चे अधिकारी हबीब यांच्याशी फोनवर संवाद साधला व हे काटेरी झाडे आठ दिवसाच्या आत काढा, अन्यथा प्रहार स्टाइल दाखवू असा इशारा देण्यात आला होता.
नॅशनल हायवे चे अधिकारी यांनी प्रहारच्या मागणीनुसार चार दिवसात ही काटेरी झाडे काढायला सुरुवात केली, तरी प्रहार जनशक्ती पक्ष मोहोळ तालुक्याच्या वतीने जनतेचे व दुर्लक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही तालुकाध्यक्ष वैभव जावळे यांनी सागींतले.
शेतकऱ्यांना युरिया न देणाऱ्या खत दुकानदारावर कारवाई करा…
ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना गरज असताना मोहोळ तालुक्यातील खत दुकानदार शेतकऱ्यांना युरिया देत नाहीत व युरिया घ्या पण त्यासोबत लिंक म्हणजेच छोटं पिल्लु घ्या तरच युरिया मिळेल, अशी वागणूक दुकानदार शेतकऱ्यांना देत आहेत, अशा तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे येत असून यामुळे शेतकऱ्यांना थेट युरिया न देणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जावळे व पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांच्याकडे केली.